breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वल्लभनगर आगाराच्या बसला महाडमध्ये अपघात, 25 प्रवासी जखमी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने दापोली-पिंपरी-चिंचवड बसला महाडच्या रेवतले तालुक्यात अपघात झाला असून बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हा उपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

MH14 BT 3384 असा बसचा क्रमांक आहे. बसमध्ये ५० प्रवासी होते. त्यातील २५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बस एका बाजूला उलटली आणि हा अपघात झाला, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महाड विभागाचे व्यवस्थापक कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत अभियंता वाघाटे आणि अमित माळी यांचीही उपस्थिती होती. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत वाहन चालक सुखरुप आहे. गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले असेही समजते आहे. पिंपरी-चिंचवडच्या वल्लभनगर आगारातून शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही बस निघाली होती. ही बस मुरुड या ठिकाणी मुक्कामी गेली होती. मुरुडहून सकाळी साडेआठच्या सुमारास ही बस पिंपरी-चिंचवडकडे निघाली होती. त्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button