breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus | भारतानंतर आता ट्रम्प यांची WHO ला धमकी

वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) अमेरिकेकडून देण्यात येणारा निधी बंद करू, अशी धमकी दिली. कोरोनासारख्या जागतिक साथीचा धोका वेळीच ओळखण्यात WHO ला अपयश आले. एवढेच नव्हे तर जागतिक आरोग्य संघटना चीनकडे अधिक लक्ष पुरवत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्याप्रमाणावर निधी पुरवला जातो. WHO चे चीनकेंद्री धोरण आणि सुरुवातीच्या काळात कोरोना व्हायरससंदर्भात मी घेतलेल्या भूमिकेला आंतरराष्ट्रीय समूदायाने अयोग्य ठरवले होते. यानंतर चीनमधील कोरोनाची तीव्रता कमी करण्यासाठी WHOकडून बीजिंगला अनुकूल अशी भूमिका घेण्यात आली होती.

यानंतर WHO ने कोरोनाच्याबाबतीत चीनने पाळलेल्या पारदर्शक कारभाराचेही कौतुक केले होते. मात्र, चीनने अधिकृतपणे जाहीर केलेला मृतांचा आकडा खरा आहे किंवा नाही, याबाबत अजूनही शंकेचे वातावरण आहे. याबाबत WHO ला नेमकी माहिती असायला पाहिजे होती किंवा कदाचित त्यांना माहितीही असेल, असे ट्रम्प यांनी म्हटले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button