breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

हृदयद्रावक : उत्तरप्रदेशातील ट्रक अपघातात २४ मजुरांचा मृत्यू; २२ मजूर जखमी

औरैया ।महाईन्यूज ।टीम ऑनलाईन

उत्तर प्रदेशमधील औरैयामध्ये झालेल्या ट्रक अपघातात २४ स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकद्वारे हे मजूर राजस्थानहून आपल्या घरी निघाले होते. या भीषण अपघातात २२ मजूर जखमी झाले आहे. मजुरांना घेऊन भरधाव निघालेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. आज शनिवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमाराला हा भीषण अपघात झाला. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे मजूर बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील होते. एका वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. 

पोलिसांचे पथक या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत बचाव कार्य सुरू केले. या अपघातात २४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर २२ मजूर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी १५ मजूर गंभीर आहेत, अशी माहिती औरैयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अर्चना श्रीवास्तव यांनी दिली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून जखमींना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेशही दिले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पहाणी करून अपघात नेमका कशामुळे झाला यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे निर्देश योगी यांनी दिले असल्याची माहिती उत्तर प्रदेश राज्याचे गृह विभागाचे अपर मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button