breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: भारतात प्रति लाख ७.१ रुग्ण
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात प्रति लाख व्यक्तींमागे ७.१ इतकी करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या आहे. तर जागतिक स्तरावर प्रति लाख व्यक्तींमागे ही संख्या ६० इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरात सोमवारपर्यंत ४५ लाख २५ हजार ४९७ रुग्णांची नोंद झाली आहे.