breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

करोना दोन वर्षांपूर्वीच आला होता, हरभजनचा खुलासा

सध्याच्या घडीला करोना व्हायरसने जभरात थैमान घातले आहे. पण हा करोना व्हायरस दोन वर्षांपूर्वीच आला होता, असा खुलासा भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगने केला आहे.हरभजनने एक ट्विट केले आहे. या ट्विटनुसार हा करोना व्हायरस दोन वर्षांपूर्वीच आला होता. दोन वर्षांपूर्वीच मी या करोना व्हायरसबद्दल ऐकले होते, असा खुलासा हरभजनने केला आहे.हरभजनने केलेला खुलासा धक्कादायक आहे.

करोना व्हायरस हा चीनमधून आल्याचे आपणा सर्वांनाच माहिती आहे. पण जागतिक आरोग्य संघटनेने करोना व्हायरस हा कोणत्या देशात किंवा धर्मात तयार होतो, या गोष्टीचे खंडन केले आहे. त्याचबरोबर करोना व्हायरस हा प्रयोगशाळेत तयार होऊ शकत नाही, असेही काही डॉक्टरांनी सांगितले आहे. पण या करोना व्हायरसची कुणकुण दोन वर्षांपूर्वीच लागली होती, असे हरभजनने सांगितले आहे.
हरभजनच्या वक्तव्यावर काही जणांनी आक्षेप घेतला आहे, तर काही जणांनी त्याची खिल्ली उडवली आहे. काही जण हरभजनला ट्रोलही करताना दिसत आहेत. पण हरभजन म्हणतोय ते काही चुकीचे नाही. कारण याबाबतचा व्हिडीओच हरभजनने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button