breaking-newsताज्या घडामोडीपुणे

क्रेनने उचलेली प्लेट अंगावर पडल्याने पुण्यात मेट्रोच्या कामगाराचा मृत्यू

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकाजवळ मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनने उचलेली प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. याप्रकरणी क्रेन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश बेसाहू श्याम (वय २३, रा. नागपूर चाळ, येरवडा, मूळ- मध्य प्रदेश) असे मृत्यू झालेल्या कामागाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रामचंद्र भोसले (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार क्रेन चालक जितेंद्र उमा प्रजापती (वय ३०, रा. वडगाव बुद्रुक) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात मेट्रोचे वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे. बंडगार्डन रस्त्यावरील मोबोज चौकात देखील मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी रस्त्यावर दिवसा गर्दी असते. त्यामुळे रात्रपाळीत देखील काम केले जाते. सोमवारी पहाटे क्रेमच्या सहाय्याने काम सुरू होते. त्यावेळी क्रेनच्या चालकाने क्रेन हायगयीने चालवून क्रेनने उचलेली प्लेट घसरून खाली पडली. त्यावेळी खाली उभा असलेला कामगार उमेश याच्या अंगावर ती प्लेट पडली. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात क्रेन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button