breaking-newsताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: बाजार सुरू व्हायची खात्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/grains-1.jpg)
भुसार बाजारातील व्यापाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे. बाजारआवारातील निर्जंतुकीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. घाऊक बाजारात खरेदीसाठी गर्दी न होऊ देणे तसेच अन्य उपाययोजनांबाबत चर्चा झाली आहे. जेव्हा राज्यातील अन्य बाजार बंद होते. तेव्हा पुण्यातील भुसार बाजारातील व्यापाऱ्यांनी राज्यातील वेगवेगळ्या भागात अन्नधान्याचा पुरवठा केला. त्यामुळे तुटवडा जाणवला नाही. उपायोजना केल्यानंतर व्यापारी पुन्हा व्यापार सुरू करतील, अशी खात्री आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.