breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन, पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार

पुणे |महाईन्यूज|

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शुक्रवारी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. एअर कमांडर राहुल भसीन, गुप्त वार्ता विभागाचे संचालक अरविंद कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल, पोलीस आयुक्त डॉ के. व्यंकटेशम, उपजिल्हाधिकारी (राजशिष्टाचार) अमृत नाटेकर तसेच योगेश गोगावले, जयंत येरवडेकर उपस्थित होते.

देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेला उपस्थित राहण्यासाठी अमित शहा पुण्यात आले आहेत. पुण्यात होणाऱ्या या परिषदेचे आयोजन केंद्रीय गृहमंत्रालयाकडून करण्यात आले आहे. अमित शहा दोन दिवस या कार्यक्रमामध्ये उपस्थिती राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button