breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनाच्या भितीने डाॅक्टरानी सांगोल्यात खासगी रुग्णालये ठेवली बंद

सांगोला- विकास शिंदे

योग्य काळजी आणि सुरक्षित अंतर ठेवल्यास करोना बरा होऊ शकतो. तरीही कोरोनाच्या भितीने खासगी डॉक्टर प्रत्येक नागरिकाकडे संशयाने पाहू लागले आहेत. तसेच दवाखाने बंद ठेवू नका, असे आवाहन राज्य सरकारने केल्यानंतरही सांगोला शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सांगोला शहर व तालुक्यातील खासगी डाॅक्टरनी आपापल्या हाॅस्पीटलला टाळे ठोकले आहेत. त्यामुळे अन्य आजारांनी ञस्त असलेल्या रुग्णांना नाहक ञास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देवून ओपीडी बंद ठेवणा-यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतुन होवु लागली आहे.

खासगी रुग्णालयात बाह्य रुग्ण कक्ष (ओपीडी) बंद ठेवण्यात आले आहेत. कोणत्याही नागरिकांची तपासणी केली जात नाही. अत्यावश्यक विभाग सुरु ठेवुन त्यातही नवीन रुग्णांना अॅडमिट न करता पुवीं अॅडमिट असलेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे डॉक्टरकडुन हा नागरिकांवर एक प्रकारे अन्याय होत आहे. त्यामुळे नागरिकांना जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी जावे लागत आहे. मात्र रुग्णाची संख्या अधिक असल्याने तेथील अपुरे डॉक्टर व सोयी सुविधेचा अभाव आहे. सरकारी रुग्णालयामध्ये सोय होत नसल्याने त्यांची कोंडी झाली.

या आपत्कालीन स्थितीत खासगी रुग्णालयांमध्ये ‘कोविड १९’ची केंद्रे तयार करण्यात यावीत. वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी खासगी आरोग्य व्यवस्थेनेही मदत करावी, असे आवाहन राज्य सरकारने वारंवार केले आहे. तरीही सांगोला शहर व जिल्ह्यातील काही भागातील खासगी रुग्णालये बंद ठेवुन डाॅक्टरनी पळ काढल्याचे दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button