breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ

#CoronaVirus: नागपूरमधील खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वॉच, तुकाराम मुंढेंकडून विशेष पथकाचं गठन

नागपूर: कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलेलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विषेश पथक लक्ष ठेवणार आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं हे विषेश पथक गठन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणार असल्याचं दिसत आहे. मनपाचं हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांमध्ये 80 टक्के बेड राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे.

मात्र, काही रुग्णालयांकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही खासगी रुग्णालयं तर अतिरिक्त शुल्क आकारत असल्याच्याही तक्रारी देखील नागरिक करत आहेत. अशा रुग्णालयांवर महानगरपालिकेकडून कारवाई होणार आहे. तुकाराम मुंढे यांनी नागपूरमध्ये जी रुग्णालयं अतिरिक्त शुल्क आकारतील त्यांची तक्रार करण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं आहे. या तक्रारींची त्वरीत दखल घेत अशा मुजोर रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button