breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आयडिया व्होडाफोनचे नेटवर्क गुल; सकाळपासून ग्राहक त्रस्त

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील काही भागांत आयडिया- व्होडाफोनच्या ग्राहकांना आज सकाळपासून नेटवर्क नसल्याच्य़ा समस्येला सामोरे जावे लागले. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे.

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात कालपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यातच सकाळपासून नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना अर्ध्या तासापूर्वी रेंज आली आहे. मात्र, त्यामध्ये इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले.

पुण्यातील काही ग्राहकांनी कालपासूनच कंपनीकडे तक्रार केल्या आहेत. मात्र, त्यांना कंपनीने लवकरच सुरु केले जाईल, तांत्रिक अडचण असल्याचे उत्तर दिले आहे. मात्र, आज दुपारपर्यंत त्या ग्राहकांना नेटवर्कची वाट पहावी लागली आहे.

पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button