क्रिडाताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराष्ट्रिय

आंतरराष्ट्रीय नेमबाजी संघ निवडीसाठी अरुण पाडुळे स्पोर्ट फाउंडेशनमधील नेमबाजांची निवड

पिंपरी चिंचवड मधील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

पिंपरी : नॅशनल रायफल असोसिएशन दिल्ली, आयोजित 66 वी दहा मीटर रायफल व पिस्तूल नेमबाजी राष्ट्रीय स्पर्धा भोपाळ येथे सुरू असून या राष्ट्रीय स्पर्धेत भारतातून हजारो नेमबाजांनी सहभाग नोंदवला आहे. पिंपरी चिंचवड येथील अरुण पाडुळे स्पोर्ट प्रमोशन फाउंडेशन मधील पाच नेमबाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. त्यापैकी नेमबाज राजनंदिनी जितेंद्र यादव हिने युथ गटात 600 पैकी 549 व अनुष्का वसंतराव बाबर हिने सीनियर गटात 600 पैकी 554 गुण संपादन केल्याने यांच्या या उत्कृष्ट अशा कामगिरीमुळे लवकरच होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी भारतातून निवडल्या जाणाऱ्या संघ निवडीसाठी नेमबाजांची निवड झाली असल्याने, लवकरच पिंपरी चिंचवड मधील खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर दहा मीटर नेमबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील.

अरुण पाडुळे स्पोर्ट फाउंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातून पिंपरी चिंचवड मधील मागील 2 वर्षात 10 खेळाडू हे आंतरराष्ट्रीय संघ निवड चाचणी पात्र ठरले असून, 22 राष्ट्रीय खेळाडू बनले आहे. याच वर्षी अकलूज येथे झालेल्या शालेय झोनल नेमबाजी स्पर्धेत “भक्ती नारायणकर हिला कांस्यपदक” मिळाले असून तिची निवड शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. तसेच युनिव्हर्सिटी स्पर्धेत अनुष्का बाबरला कांस्यपदक मिळाल्याने तिची निवड राष्ट्रीय युनिव्हर्सिटी स्पर्धेत झाली आहे.

वरील सर्व राष्ट्रीय नेमबाजांचे प्रशिक्षक व प्रशिक्षण केंद्रप्रमुख अरुण पाडुळे सर स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून त्यांचं पिंपरी चिंचवडला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी मध्ये पदक मिळवून देण्याचं ध्येय आहे. वरील सर्व राष्ट्रीय नेमबाजांचा पिंपरी चिंचवड मध्ये सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button