breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! “राम मंदिर भूमिपूजनाचा दिवस बदला, अन्यथा जीवे मारु”, मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्याला धमकी

बेळगाव: अयोध्यात राम मंदिर भूमिपूजनाचा  मुहूर्तावरुन राजकारण तापलेलं आहे. अशातच आता भूमिपूजनाचा मुहूर्त सांगणाऱ्या पुजाऱ्यालाच जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. कर्नाटकमधील या पुजाऱ्याने आपणच मंदिराचा मुहूर्त सांगितल्याचा दावा केलेला आहे. एन. आर. विजयेंद्र शर्मा असं या बेळगावमधील पुजाऱ्याचं नाव आहे. ते म्हणाले, “देशभरातून मला राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त बदलण्यासाठी धमकीचे फोन येत आहेत. मुहूर्त न बदलल्यास त्याचे परिणाम भोगण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे.”

विजयेंद्र शर्मा म्हणाले, “मला कॉल करणाऱ्यांनी विचारलं की तुम्ही भूमिपूजनासाठी या तारखा का दिल्या आणि का या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहेत? मी त्यांना सांगितलं की आयोजकांनी मला मुहूर्त सांगण्याची विनंती केलेली आणि मी गुरु या नात्याने माझं कर्तव्य पूर्ण केलं आहे. मात्र, धमकी देणाऱ्यांनी आपलं नाव सांगितलं नाही.” पुजाऱ्यांनी धमकीच्या फोनबाबत तक्रार केल्यानंतर बेलगावमधील टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पुजाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काही पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. असं असलं तरी पुजारी विजयेंद्र शर्मा यांनी आपण अजुनही या धमकीच्या फोन कॉल्सला गंभीरपणे घेत नसल्याचं म्हटलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button