breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus |धारावीतील ७ लाख जणांची तपासणी होणार

मुंबई | मुंबईत कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आणखी एक बळी गेला आहे. धारावीच्या कल्याणवाडीमध्ये एका ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं धारावीतील मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. हे पाहता धारावीतील ७ लाख लोकांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील १० दिवसात ७० लाख जणांची तपासणी करणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहे. इथे आढळलेल्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. जे कोरोना बाधित आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. आठ दिवसांपूर्वी धारावीत कोरोनाचा प्रवेश झाला. एका गारमेंट व्यावसायिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर धारावीत कोरोनाचं संकट उभं राहिलं. धारावीत कोरोना शिरकाव होण्यास तबलिगी जमात कनेक्शन असल्याची माहिती पुढे आली. दिल्लीतील निजामुद्दीन इथं तबलिगी जमातच्या मरकज कार्यक्रमात सहभागी झालेले काही जण धारावीत येऊन राहिले होते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या गारमेंट व्यावसायिकानंच त्यांना आश्रय दिला होता, अशी माहिती नंतर समोर आली. धारावीतून हे लोक केरळला गेल्याचं कळतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button