breaking-newsमहाराष्ट्र

राज्य सरकारची ई- पास बाबत आज महत्वाची बैठक

मुंबई – केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देशभरात ‘अनलॉक ४’च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर राज्य सरकारच्या गाईडलाईन्सही जारी होणार आहेत. याअंतर्गत ई-पासबाबत आज (३१ ऑगस्ट) राज्य सरकारची महत्त्वाची बैठक होणार आहे. ई-पास सुरुच राहणार की हद्दपार होणार याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.


ई-पास संदर्भात राज्यभरात संताप व्यक्त केला जात होता. कारण, अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात होती. त्यासंदर्भात ही एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. या बैठकीला राज्यातील सचिव आणि गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राज्यातील ई-पास रद्द होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button