breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनामुळे महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक मृत्यू

मुंबई | महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजच्या एका दिवसामध्ये राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दिवसभरात राज्यात कोरोनामुळे २५ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे राज्यातल्या मृत्यूंची संख्या ९७वर गेली आहे. आज महाराष्ट्रात कोरोनाचे २२९ नवे रुग्ण आढळले. यातले एकट्या मुंबईतच कोरोनाचे १६२ रुग्ण वाढले आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,३६४ एवढी झाली आहे.

कोरोनामुळे आज झालेल्या मृत्यूंपैकी १५ पुरुष तर १० महिला आहेत. मृत्यू झालेल्या २५ पैकी १२ जण हे ६० वर्षांवरील आहेत. तर मुंबईमध्ये १०१ वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांपैकी ११ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील तर दोघे ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यू झालेल्या २१ रुग्णांमध्ये (८४ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.कोरोनाचे १२५ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आलं आ हे. तर ३६,५३३ जण घरगुती क्वारंटाईनमध्ये आणि ४,७६१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button