breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: धक्कादायक! कूलरसाठी व्हेटिंलेटरचा प्लग काढला, रुग्णाचा मृत्यू

जयपूर: राजस्थानच्या कोटामध्ये शासकीय रुग्णालयात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा मृत्यू व्हेंटिलेटरचा प्लग काढल्याने झाला आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याने कूलर सुरु करण्यासाठी चुकीने व्हेंटिलेटरचा प्लग काढला गेला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. ही समिती या प्रकरणाचा तपास करणार आहे.

या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा संशय होता. त्यामुळे 13 जूनला त्याला कोटा येथील महाराव भीम सिंह रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

गरम होतं म्हणून कुटुंबाने कूलर आणला

या व्यक्तीला सुरुवातीला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. मात्र, अतिदक्षता विभागात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे 15 जूनला या व्यक्तीला विलगीकरण वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. विलगीकरण कक्षात खूप उकडत होतं, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्यासाठी कूलर खेरदी करुन आणला.

मात्र, विलगीकरण वॉर्डात कूलर चालवण्यासाठी कूठलाही प्लग त्यांना सापडला नाही. त्यामुळे त्यांनी व्हेंटिलेटरचा प्लग काढला, असा आरोप आहे. प्लग काढल्यानंतर अर्ध्या तासाने व्हेंटिलेटरचा पॉवर संपला आणि त्यानंतर या रुग्णाची तब्येत खालावली. तात्काळ डॉक्टर आणि नर्सला बोलावण्यात आलंहोते. मात्र, तोपर्यंत या व्यक्तीचा मृत्यू झालेला होता.

तपासासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन

रुग्णालयातील तीन सदस्यीय समितीमधील उपअधीक्षक, परिचारीका अधीक्षक आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी हे या प्रकरणाचा तपास करतील, असं रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितलं. शनिवारी रात्रीपर्यंत त्यांना त्यांचा अहवाल सादर करायचा आहे. विलगीकरण कक्षातील मेडिकल स्टाफचा जबाब नोंदवण्यात आला आहे. मात्र, मृतकाच्या कुटुंबातील लोक कुठल्याही प्रकारचा सहकार्य करत नाही, असंही डॉ. नवीन सक्सेना यांनी सांगितलं.

कुटुंबाचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन

याप्रकरणी जो कोणी दोषी असेल त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं. तर, मृतकाच्या कुटुंबाला कूलर चालवण्याची परवानगी दिली नाही, असंही रुग्णालय प्रशासनाने सांगतिलं. त्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button