breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फ्रान्समध्ये हवेत दोन विमानांची भीषण धडक; ५ जणांचा मृत्यू

पॅरिस – फ्रान्समध्ये एका प्रवासी विमानाने मायक्रोलाईट विमानास धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, हवेतच भीषण धडक झाल्यामुळे विमानांनी पेट घेतला. ही आग मोठी असून अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळते आहे. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

अपघाताबाबत माहिती देताना सरकारी प्रवक्त्या नादिया सेगैर म्हणाल्या, ‘मायक्रोलाईट विमानात दोनजण प्रवास करत होते ज्याने DA40 या प्रवासी विमानाला भीषण धडक दिली. या प्रवासी विमानात 3 जण प्रवास करत होते, ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.’

या अपघातानंतर मायक्रोलाईट विमान एका घराजवळ उतरले, सुदैवाने घराजवळ विमान पडल्यानंतर कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र विमानात असलेल्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर दुसरं प्रवासी विमान हे एका स्थानिक ठिकाणी लँड झालं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button