breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात चोवीस तासांत चार हजार नवे बाधित
देशात करोना विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शनिवारी (१६ मे) २ हजार ७५२ पर्यंत, तर करोनाबाधितांची संख्या ८५,९४० पर्यंत पोहोचली. २४ तासांत करोना मृत्यूंच्या संख्येत १०३ ची, तर करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संख्येत ३,९७०ची भर पडली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.