breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळत रहाटणीकरांचा रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी


कोरोना विषाणूच्या धर्तीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारच्या वतीने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

त्याअंतर्गत आज (सोमवारी) प्रभाग क्रमांक 27 रहाटणी-तापकीरनगर येथील विमल गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 दरम्यान रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात तरुण रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करत गर्दी टाळण्यावर भर दिला होता. त्यामुळे अतिशय सुरक्षित वातावरणात हे रक्तदान शिबीर संपन्न झाले. रक्तदान करणाऱ्या युवकांना मान्यवरांच्या व डॉक्टरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच आयोजकांच्या वतीने सर्व डॉक्टर, कर्मचारी आणि रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

राज्य सरकारने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार लक्ष्मण जगताप यांनी संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात 29 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. त्याला सर्वच मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, नगरसेविका सुनीता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, स्वीकृत सदस्य संदीप नखाते यांनी विशेष मेहनत घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button