breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: तबलिगी जमात आणि रोहिंग्यांचं कनेक्शन, गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांना अलर्ट

केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना निर्वासित मुस्लीम रोहिंग्यांची माहिती मिळवत त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. रोहिंग्या तबलिगी जमातच्या सदस्यांच्या संपर्कात आल्याचा संशय असल्याने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून हा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं असून रोहिंग्या आणि तबलिगी जमातमधील संबंधांचा तपासस करण्यास सांगितलं आहे. सोबतच रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्यांशी संबंधित लोकांची करोना चाचणी करण्यासही सांगितलं आहे. यासंबंधी गरज असलेली सर्व पावलं उचला असा आदेश गृहमंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यांचे पोलीस प्रमुख आणि मुख्य सचिवांना पाठवण्यात आलेल्या पत्रात सांगण्यात आलं आहे की, “रोहिंग्या मुस्लिमांनी तबलिगी जमातच्या इज्तिमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याची माहिती मिळत आहे. यामुळे त्यांना करोनाची लागण झाली असल्याचा संशय आहे”. या पत्रात हैदराबाद, तेलंगण, दिल्ली, पंजाब, जम्मू आणि मेवाट येथील रोहिंग्यांवर विशेष लक्ष देत ओळख पटवण्यास सांगण्यात आलं आहे.

तेलंगणमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रोहिंग्यांनी तबलिगी जमातच्या हरियाणामधील मेवाट येथील कार्यक्रमात हजेरी लावली होती. हेच लोक दिल्लीमधील निजामुद्दीने मरकजमध्येही सहभागी झाले होते. रोहिंग्यांशी संबंधित लोक श्रमविहार आणि शाहीनबाग येथेही गेले होते. पत्रानुसार जे लोक या ठिकाणांवर गेले होते ते आपल्या छावण्यांमधून गायब आहेत. तबलिगी जमातशी संबंध आल्याने रोहिंग्या मुस्लीम आणि त्यांच्याशी संबंधितांची करोना चाचणी करणं महत्त्वाचं आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीमधील निजामुद्दीने परिसरातील मरकजमध्ये तबलिगी जमातचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी अनेक तबलिगी करोनाबाधित आढळले आहेत. तसंच कार्यक्रमात सहभागी इतर राज्यांमध्ये गेल्यानंतर तिथेही करोनाचा फैलाव झाला आहे. यानंतर देशभरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. सरकाराने आतापर्यंत तबलिगी जमातशी संबंधित ३० हजार लोकांचा शोध घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button