ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वीजेच्या बाबतीत मोशीतील डेस्टिनेशन ओस्टीया गृहनिर्माण सोसायटी आत्मनिर्भर; केली वार्षिक साडे आठ लाखांची बचत

मोनोक्रिस्टलाईन तंत्रज्ञानामधील 70 किलोवॅटच्या सौरउर्जा प्रकल्पातून दिवसाला होणार 280 युनिटची वीज निर्मिती, पिंपरी- चिंचवड शहरातील पहिलाच प्रकल्प

पिंपरी चिंचवड | स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोशी आळंदी रोडवरील कै. निवृत्ती गणपत सस्ते पाटील इस्टेट येथील बहुचर्चित अशा डेस्टिनेशन ओस्टीया गृहप्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ॲानग्रीड पाॅवर प्लॅन्ट अंडर एमएससीडीसीए सोलर रुफटाॅप नेटमीटरींग स्कीम पाॅवर प्लॅन्ट हा प्रकल्प उभारला आहे. 70 किलोवॅटचा हा वीज निर्मिती प्रकल्प असून त्यातून दिवसाला 280 युनिट वीजेची निर्मिती होणार आहे.

ती वीज महावितरणला देण्यात येणार आहे. सोसायटीला एका दिवसासाठी 260 युनिट वीज लागते. महावितरण ही वीज सोसायटीला देणार आहे. सोसायटीमधील पार्किंग, ओपन स्पेस आणि घरातील रात्रीचा वीजपुरवठा त्यातून होणार आहे. यामुळे सोसायटीतील नागरिकांची आर्थिक बचत होणार असून विजेचा प्रश्न सुटणार आहे. वीजेच्या बाबतीत सोसायटी आत्मनिर्भर झाली असून विजेचा दरमहिन्याचा 70 हजार रुपयांचा खर्च वाचणार आहे. दरवर्षी सुमारे साडे आठ लाख रुपयांची बचत होणार आहे.

मोनोक्रिस्टलाईन तंत्रज्ञान मध्ये सौर उर्जा विज निर्मितीचा पिंपरी- चिंचवड शहरातील हा पहिलाच प्रकल्प आहे. डेस्टिनेशन ओस्टीया प्रोजेक्टचे विकसक डी. आर. गव्हाणे डेस्टिनेशनचे संचालक, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हस्ते या प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. प्रक्लपाचे विकसक अमित गव्हाणे, मनोज पाटील, सोसाटीचे अध्यक्ष महेश पाटील, अशोक राव, सेक्रटरी बिपीन कांचन, अनिरुद्ध प्रकाश तिवारी, खजिनदार माजीद शेख, पांडुरंग पाटील तसेच सोसाटीतील सभासद उपस्थित होते. तसेच प्रकल्पाचे जागा मालक हिरामण सस्ते, मानिक सस्ते, भानुदास सस्ते, दयानंद सस्ते व अनुराग सस्ते हेही उपस्थित होते.अजित गव्हाणे म्हणाले, “शहरातील काही गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाणी, लाईट, पार्किंग मेंन्टनन्स अशा समस्यांच्या अनेक नकारात्मक बातम्या आपण पेपर मध्ये वाचतो. महापालिकेत सुद्धा विविध तक्रारी येत असतात. परंतु, डेस्टिनेशन ओस्टीया प्रकल्पातील आपण सर्वांनी एकत्र येऊन एक सकारात्मक प्रकल्प उभा केला आहे. यामुळे वीजेचा प्रश्न मिटणार असून सोसायटीतील नागरिकांचा आर्थिक ताण कमी होणार आहे. या प्रकल्पाचा आदर्श पिंपरी-चिंचवड शहरात घेतला जाईल.भविष्य काळात महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकल्पाना प्रोत्साहन दिले जाईल. व्यवसाय करत असताना वडील कै. दामोदर गव्हाणे यांनी एक गोष्ट आमच्या मनात बिंबवली की काळानुरूप बदल घडवत सभोवतालच्या परिसराचा विकास करावा. लोकांचे जीवनमान उंचावणे हाच व्यवसायाचा हेतू असावा. त्यांची ही शिकवण या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे”.

सोसायटीचे खजिनदार माजीद शेख यांनी प्रास्ताविक करताना प्लांटची माहिती देताना सांगितले की, “अनेक आव्हानांवर मात करून हा प्रकल्प उभा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. मोनोक्रिस्टलाईन ही जर्मन मधील एकमेव उत्तम पर्याय आहे. विकसकांनी 2017 मध्ये सदनीकांचा ताबा देतेवेळी सर्व सदनिकाधारकांकडून सोसायटीला 40 लाख रुपये ‘सिंकिंग फंड’ उपलब्ध करून दिला होता. त्या फंडतील एका हिस्याची मुदत ठेव बँकेत तारण ठेऊन अंत्यत अल्प व्याज दरात बँकेने प्लान्टसाठी कर्ज दिले.काही फंड सदनिकाधारकांनी स्व:हिस्यातून उभा केला. त्यातून 70 किलोवॅटचा हा वीज निर्मिती प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून दिवसाला 280 युनिट वीजची निर्मिती होणार असून ती वीज महावितरणला देण्यात येणार आहे. सोसायटीला दिवसाला 260 युनिट लागतात. तेवढे महावितरणकढून घेतले जाणार आहेत. जास्त वीज वापरली तर महावितरण बील आकारेल. युनिट शिल्लक राहिले तर पुढील महिन्यात ऍडजस्ट केले जाईल. सांडपाणी प्रकल्प, पिण्याचे पाणी, बोअरवेलचे पंपिंग, पार्कींगमधील वीज आणि रात्री लागणारी वीज यातून भागणार आहे.

प्लान्ट उभारणीसाठी एकुण ₹ 33 लाख खर्च करण्यात आला आहे. सोसायटीची ही गुंतवणूक अडीच वर्षातच वसूल होणार आहे. या प्रकल्पाची वॉरंटी 25 वर्षांची आहे. प्रत्येक सदनिकेला जास्तीचे युनिट वापरायला देता येणार आहेत. प्रत्येक घराला 25 युनिट दिले जाणार आहेत. त्यामुळे सदनिकाधारकाचे बील वाचणार आहे. त्यामुळे मेंटन्स कमी होणार आहे.सदनिका धारकांची आर्थिक बचत होणार आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी महावितरणचे खूप सहकार्य लाभले आहे. सोसायटीला दरमहा साधारणपणे 65 हजार ते 70 हजार रुपये लाईट बिल भरायला लागते. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने तो खर्च अवघा 2500 ते तीन हजार रुपयांपर्यंत होणार आहे. सोसायटीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. त्यासाठीचे पंपिंग 24 तास चालू राहत होते.त्यामुळे विजेचा येणारा खर्च आवाक्याबाहेर गेला होता. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. सर्वांनी याचे अनुकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.प्लांट उभारणीचे काम सणओशायन सोलर कंपनी ला देण्यात आले होते. कंपनीने कमी जागेत इमारतीच्या टेरसवर सोलर प्लान्ट उभा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button