breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कामावर जीन्स, टी-शर्ट घालून येण्यास बंदी

नाशिक – नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांना जीन्स, टी-शर्ट आणि स्लीपर घालून कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. तर महिलांना साडी, सलवार-कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट-कुर्ता परिधान करून येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी हे आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारने राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली असतानाच नाशिक महापालिकेनेही हा आश्चर्यकारक निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार महापालिकेतील 5 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा ड्रेसकोड लागू होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे महापालिका आयुक्त केवळ ड्रेसकोड लागू करूनच थांबलेले नाहीत. तर त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालून येण्याची सक्तीही केली आहे. त्यामुळे सरकारी आदेश म्हणून या कर्मचाऱ्यांना खादीचे कपडे घ्यावे लागणार आहेत.

आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशांनुसार पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना यापुढे रंगबेरंगी, गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करता येणार नाहीत. तर महिलांसाठीही पालिका आयुक्तांनी ड्रेसकोड लागू केला आहे. त्यानुसार महिलांना आता साडी, सलवार-कुर्ता, ट्राऊझर पॅन्ट-कुर्ता परिधान करूनच कामावर यावे लागणार आहे. आयुक्तांच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button