breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: तबलिगीच्या संशयित कोरोनाग्रस्ताचं गैरवर्तन; उपचारासाठी आलेल्या नर्ससमोर अश्लील कृत्य

सध्या देशात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत पोलीस, डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता करोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. तर दुसरीकडे तबलिगीचे संशयित रुग्ण वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन करत असल्याची माहिती समोर आली आहे. गाझीयाबादमधील एमएमजीमध्ये दाखल करण्यात आलेल्या काही तबलिगींनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. एवढचं नाही तर उपचारासाठी आलेल्या परिचारिकेसमोरही कपडे बदलण्यासारखी कृत्य करण्याचे प्रकार काहींनी सुरू केल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर त्यांना तुरूंगातील बॅरेकमध्ये बंद करण्यावर विचार सुरू आहे.

रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तबलिगीचे करोना संशयित गैरवर्तन करत असल्याची माहिती रूग्णलालयाचे सीएमएलएस रविंद्र राणा यांनी दिली. ते सतत या ठिकाणी अश्लील कृत्य करत आहेत. तसंच रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनही करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून ते मोठा गोंधळ घालतात. इतकंच काय तर उपचारासाठी आलेल्या परिचारिंकासमोरही कपडे बदलण्यासारखे प्रकार करत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button