breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus : ठाण्यात आठवडा बाजार, चायनीजगाड्या, हातगाड्या तात्काळ बंद करण्याचे आदेश

कोरोना या व्हायरसचा सामना करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील सर्व जलतरण तलाव, मॉल्स, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत..त्याचप्रमाणे आता ठाण्यामध्ये सर्व प्रभागातील आठवडा बाजार, गर्दीची ठिकाणे, चायनीजगाड्या, हातगाड्या तात्काळ बंद करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेवून शहरातील गर्दी नागरिकांनी स्वत:हून कमी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. या अनुषंगाने ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री यांनी देखील  ठाणे शहर व  परिसरामध्ये गर्दी होणार नाही या दृष्टीकोनातून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळच्या वेळेस खाऊगल्ली,  चायनीज तसेच हातगाड्यांवर होणारी खवय्येंची गर्दी लक्षात घेता आजपासून या सर्व हातगाड्या तसेच आठवडी बाजार देखील तात्काळ बंद करावेत अशा सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला देत नागरिकांच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेत असल्याचे नमूद केले आहे.

सुचना देऊनही आठवडाबाजार, तसेच हातगाड्या सुरु राहिले तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागसमिती कार्यालयात पथक तयार करण्यात आलं आहे…या पथकाच्या माध्यमातून शहरात कुठेही आठवडी बाजार तसेच हातगाड्या व चायनीज गाड्या यांच्यावर करडी नजर असणार आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button