breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

पुणे-मुंबई महामार्गावर आज पुन्हा एकदा दोन तासांचा ब्लॉक; वाचा सविस्तर..

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. दरड काढण्यासाठी आज पुन्हा दोन तासांचा ब्लॉग घेतला जाणार आहे. यामुळे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक किवळे येथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास कामशेच बोगद्याच्या जवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, ही धोकादायक दरड हटवण्यासाठी आज दुपारी २ ते ४ च्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकला अधिक वेळ लागण्याती शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत BCCI ची मोठी घोषणा!

दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळेस दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री दहाच्या सुमारास आडोशी बोगद्याच्या जवळ दरड कोसळली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन तासांचा ब्लॉक घेत दरड हटवण्याचे काम करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button