breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
#CoronaVirus: जॅकलिन म्हणते लॉकडाउनच्या काळात समजतंय आयुष्य अगदीच…
“लॉकडाउनच्या काळात समजतंय आयुष्य अगदीच छोटं आहे.. असं म्हणत जॅकलिन फर्नांडीसने तिच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. सध्याच्या काळात आयुष्यातला एक मोठा धडा आपण शिकतो आहोत. आयुष्य अगदीच छोटं आहे असं जॅकलिन फर्नांडिसने म्हटलं आहे. आपण या पृथ्वीवर जन्माला आलो आहे हे आपलं भाग्य आहे. मात्र आपण आपल्या पृथ्वीला गृहित धरतो. त्यामुळे आपल्याला करोनासारख्या संकटाला सामोरं जावं लागतंय. आज लॉकडाउनच्या काळात समजतं आहे की आयुष्य किती छोटं आहे” असंही जॅकलिनने म्हटलं आहे.