breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: चीनमध्ये कोरोना रुग्णांंची संख्या घटली; इटलीत वेगाने प्रसार

बीजिंग | महाईन्युज

चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे आणखी २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील बळींची संख्या आता ३११९ झाली आहे. चीनमध्ये ८०,७०० लोकांना संसर्ग झाला आहे. हुबेईमध्ये गत काही दिवसांत संसर्ग होणाऱ्या नागरिकांची संख्या घटत आहे. चीनमध्ये ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत.

सोमवारी जे नवे रुग्ण समोर आले ते सर्व वुहानमधील होते. डिसेंबरमध्ये याच भागात पहिला रुग्ण आढळून आला होता. सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, जानेवारीत या प्रांतात लावण्यात आलेले प्रतिबंध सरकार हटवू शकते. या प्रतिबंधामुळे हुबेईमध्ये जवळपास ५.६ कोटी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button