breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

भाजपचे नाराज नगरसेवक रवी लांडगे यांचे स्थायी समिती सदस्यपद धोक्यात!

पिंपरी | प्रतिनिधी

भाजपचे निष्ठावंत नगरसेवक रवी लांडगे यांचे महापालिकेच्या स्थायी समितीचे सदस्यपद धोक्यात आले आहे. स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी प्रबळ दावेदार असताना डावलण्यात आल्यामुळे ते नाराज झाले होते. त्यानंतर समितीच्या बैठकांना हजर न राहिल्याने नियमानुसार त्यांचे सदस्यपद रद्द होणार आहे. त्यांच्या जागी नवीन सदस्य नियुक्तीची कार्यवाही प्रशासनाकडून प्रस्तावित करण्यात आली आहे.

महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत रवी लांडगे हे एकमेव बिनविरोध निवडून आले होते. तसेच, शहरात भाजप वाढविणारे दिवंगत नेते अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. पक्षाच्या निष्ठावान नगरसेवकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. पंचवार्षिकच्या अखेरच्या वर्षी त्यांची स्थायी सदस्यपदी वर्णी लागली. नंतर ते सभापतीपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांना डावलून अॅड. नितीन लांडगे यांची वर्णी लागली. त्यामुळे नाराज झालेल्या रवी लांडगे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा महापौर उषा ढोरे यांच्याकडे दिला होता.

दरम्यान, त्यांचा राजीनामा पक्षाकडून मंजूर झाला नाही. त्यामुळे ते सदस्यपदावर कायम होते. परंतु, महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आता त्यांचे सदस्यपद रद्द होत आहे. नियमानुसार स्थायी समितीचा कोणताही सदस्य सलग दोन महिने बैठकांना गैरहजर राहिल्यास सदस्यपद रद्द होते. स्थायी समितीने गैरहजर राहण्यास मंजुरी दिली असेल, तर चार महिन्यांची मुदत आहे. या प्रमाणे रवी लांडगे मार्च महिन्याच्या पहिल्या बैठकीपासून आजपर्यंत स्थायीच्या बैठकीला हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे नियमानुसार त्यांचे सदस्यपद रद्द होत आहे. प्रशासकीय पातळीवर त्यांच्यापदावर नवीन सदस्य नियुक्तीची कार्यवाही सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button