breaking-newsआंतरराष्टीय

CoronaVirus: इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका

इराण | महाईन्यूज

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर इराण सरकारने जेलमधील जवळपास 70, 000 हजार कैद्यांची सुटका केली आहे. याबाबतची माहिती येथील मिझान ज्युडिशियरी साइटवर देण्यात आली आहे. तसेच, या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिलेला आहे.

इराणमध्ये सध्या 49 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी इराण सरकारडून अनेक प्रयत्न सुरु आहे. या कोरोना व्हायरसचा मोठा धोका टाळण्यासाठी इराण सरकारने जवळपास 70, 000 कैद्यांची तात्पुरता स्वरुपाची सुटका करण्यात आली आहे. चीन अन् इटलीला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. चीनमध्ये सद्यस्थितीत 80,735 लोकांना संसर्ग झालेला आहे. तर 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये 7375 लोकांना संसर्ग झाला असून, चीननंतर सर्वाधिक मृत्यू हे इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 266 जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button