breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus: चीनमध्ये करोना संसर्गात घट

  • दिवसभरात सात बळी; नवे रुग्ण आठ, एकूण मृतांची संख्या ३,१७६

बीजिंग | महाईन्यूज

चीनमध्ये गुरुवारी करोना विषाणूने सात बळी गेले असून मृतांची एकूण संख्या ३१७६ झाली आहे. नवीन निश्चित रुग्णांची संख्या केवळ आठ होती. संपूर्ण देशात सीओव्हीआयडी १९ विषाणूचा भर ओसरला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, चीनमध्ये गुरुवारी सात जण विषाणूने मरण पावले तर त्यातील सहा जणांचा वुहानमध्ये मृत्यू झाला तर एक शांगडॉंगमध्ये मरण पावला. आठ नवीन रुग्ण हुबेई प्रांतातील आहेत. देशात ३३ नवीन संशयित रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या आता १४७ झाली आहे. गुरुवारी १३१८ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकूण गंभीर रुग्णांची संख्या आता ४०२० आहे. चीनमध्ये एकूण ८०८१३ निश्चित रुग्ण असून त्यात मरण पावलेल्या ३१७६ जणांचा समावेश आहे.

१३५२६ रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. ६४१११ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तीन नवीन रुग्ण परदेशातून आले असून त्यात दोन शांघाय तर एक बीजिंगमध्ये आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ८८ झाली आहे. हाँगकाँगमध्ये दोन मृत्यू १३१ निश्चित रूग्ण, मकावमध्ये १० निश्चित रूग्ण, तैवानमध्ये १ बळी व ४९ रुग्ण अशी परिस्थिती आहे. आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी सांगितले की, करोना विषाणूच्या साथीचा भर ओसरला आहे. नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असून जगात मात्र रुग्ण व बळी वाढत चालले आहेत. चीनला या विषाणूशी तीन महिने संघर्ष करावा लागला. वुहानमध्ये डिसेंबरमध्ये हा विषाणू सापडला होता. त्यानंतर २३ जानेवारीपासून तेथील सरकारने गांभीर्याने उपाययोजना केल्या. ५ कोटी लोकसंख्या असलेले हुबेई राज्य हे करोनाचे मुख्य ठिकाण होते. १२ फेब्रुवारीपर्यंत दैनंदिन रुग्णांचा आकडा १५ हजारांपर्यंत गेला होता. बहुतांश लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले होते. १२ हून अधिक शहरे बंद करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button