breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आजारी पत्नीची हत्या करुन ६० वर्षीय पतीने पाचव्या मजल्यावरुन मारली उडी

मुंबई:- मुंबईत एका ६० वर्षीय व्यक्तीने आपल्या ५५ वर्षीय आजारी पत्नीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. व्यवसायिक असणाऱ्या पतीने पाचव्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. मरिन लाइन्स रेल्वे स्थानकाजवळ चिरा बाजार येथील महेंद्र मेन्शन येथे ही घटना घडली.

आनंद मखेजा आपली पत्नी कविता, मुलगी दिपा तसंच भाऊ आणि त्याच्या पत्नीसोबत राहत होते. मखेजा यांचं चेंबूर येथे इलेक्ट्रॉनिक्सची एजन्सी आहे. “कविता गेल्या काही वर्षांपासून सतत आजारी होत्या. चौकशी केला असता त्यांच्यात नेहमी भांडण होत असे अशी माहिती मिळाली. पण त्यांच्यात गंभीर असा कोणताच मुद्दा नव्हता,” अशी माहिती एल टी मार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

गुरुवारी संध्याकाळी, पोलिसांना कंट्रोल रुममधून फोन आला. मोबाइल पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली असता आनंद मखेजा रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचं पोलिसांना दिलं. त्यांना जी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

एका शेजाऱ्याने सांगितल्यानुसार, “माझा मुलगा इमारतीत आला असता त्याने काहीतरी कोसळलं असल्याचा आवाज ऐकला. यावेळी आनंद मखेजा रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचं त्याने पाहिलं. यावेळी शेजारच्या अजून दोन महिला तिथे उपस्थित होत्या. त्यांनी इतर शेजाऱ्यांना कळवलं आणि पोलिसांनाही माहिती दिली”.

अजून एका शेजाऱ्याने सांगितल्यानुसार, कोणीही आनंद यांना पत्नीवर वार करताना पाहिलं नाही. त्यामुळे त्यांनी हत्या केली असं म्हणणं कठीण आहे. कविता यांचा मृतदेहही शवविच्छेदनासाठी जी टी रुग्णालयात पाठवण्यात आला.

कविता यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेला चाकू आम्ही जप्त केला आहे. मात्र कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे. कविता यांच्या मृतदेहावर सात जखमा असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी सांगितलं आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button