breaking-newsताज्या घडामोडीपुणे
CoronaVirus : घरी वेळ कसा घालवावा, शरद पवार म्हणतात…
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना नाईलाजास्तव घरी बसावे लागत आहेत. लोकांना घरी वेळ कसा घालवावा, असा प्रश्न पडला आहे. त्यांना पुस्तक वाचण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.
पवार म्हणतात कि, पुस्तक हा माणसाचा खूप चांगला मित्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग करताना घरातच बसण्याची वेळ आल्यावर लोक विचारतात तुम्ही काय करत आहात? मी सांगतो… घरी पुस्तक वाचत आहे.
सोशल ,मीडियाच्या जमान्यात लोक पुस्तकाऐवजी मोबाईलवर आपला वेळ घालवत आहेत, लोकांची पुस्तक वाचण्याची सवय मोडली आहे. शरद पवार यांचा प्रत्येक आदेश मानणारे त्यांचे कार्यकर्ते पवार यांचा पुस्तक वाचण्याचा सल्ला मानणार का ?