breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

खासदार, आमदार जागे व्हा.. पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मरठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमधील खासदार, आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार, आमदारांनो जागे व्हा, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

निगडीतील भेळ चौकात भाजपचे राज्यसभा खासदार अमर साबळे,  थेरगावला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे यांच्या घरासमोर आणि पिंपरीतील शिवसेना आमदार गाैतम चाबुकस्वार यांच्या संर्पक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाबाबत पिंपरी चिंचवडच्या खासदार, आमदारांनी केंद्र व राज्यात आवाज उठवून मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.

तसेच  आमदार महेश लांडगे यांच्या घरासमोर शेवटचे आंदोलन करण्यात आले. तर खासदार आढळराव-पाटील यांच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यानी आंदोलन केले. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरासमोर आंदोलन सुरू असताना ते बाहेर आले. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांशी संवाद साधला. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटत असेल तर आम्ही राजीनामे देऊ असे जगताप म्हणाले. यावेळी आमदार, खासदार जागे व्हा, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. यावेळी मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, धनाजी पाटील, सतीश काळे, जीवन बोऱ्हाडे, राजेंद्र देवकर, प्रवीण पाटील आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button