breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: गेल्या 24 तासांत आणखी 75 नागरिकांना कोरोनाची लागण,4 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू

देशभरात कोरोनाचं थैमान काही थांबायच नाव घेत नाहीये… गेल्या २४ तासांमध्ये आणखी ७५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर चार कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांना मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. आतापर्यंत देशात ७२४ नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे…याबाबतची, .माहिती केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी दिली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लव अग्रवाल यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गादरम्यान होणारी कमतरता लक्षात घेऊन सरकारने बीईएलला 3०,००० व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगण्यात आहे.

तर, दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, आतापर्यंत राजधानी दिल्लीमध्ये ३९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यामध्ये २९ जण परदेशातून आले आहेत. तर या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दिल्लीमध्ये दिवसाला ३-४ कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत.

दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूची दुकानं सुरु राहणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रवास आणि गर्दी टाळावी, असे आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button