breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: 10 महिन्यांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका १० महिन्यांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे… दक्षिण कन्नडचे उपजिल्हाधिकारी सिंधु बी. रुपेश यांनी ही माहिती दिली.

या पूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये एका ८ महिन्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती.बेंगळुरूतील या कोरोनाग्रस्त चिमुरडीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तिला बेंगळुरूतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीनंतर तिला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं.

या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या कुटुंबातील व्यक्तींना तसेच जवळच्या नातेवाईकांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. या चिमुकल्या मुलीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या चिमुकलीची पूर्णपणे काळजी घेतली जात असून तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच हा संसर्ग आसपासच्या परिसरात पसरू नये याची पूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे.

आतापर्यंत जगभरात कोरोना विषाणू लहान मुलांसाठी जीवघेणा सिद्ध झालेला नाही. मात्र, १ वर्षांपासूनची लहान मुले या विषाणूमुळे गंभीर आजारी पडू शकतात. कोरोना विषाणू हा ज्येष्ठ नागरिकांसाठी घातक सिद्ध झाला आहे. मात्र तरीही सर्वांनीच याबाबत काळजी घेण महत्त्वाचं आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button