breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus | गेल्या २४ तासात ७५ पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई | गेल्या २४ तासात ७५ पोलीस कर्मचाऱ्यांची कोविडची ( COVID-19)चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिसांमधील एकूण कोरोना पॉझिटिव्हची संख्या १९६४ झाली असून मृत्यूची संख्या २० वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण ८४९ पोलीस कर्मचारी बरे झाले आहेत. १०९५ कर्मचारी हे कोरोना संक्रमित आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी एएनआयला दिली आहे.पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी विश्रांती देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे दोन दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील १० पोलीस आणि १ अधिकारी असे एकूण ११, पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १, ए.टी.एस.१, ठाणे शहर १ अशा १८ पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. राज्यात सध्या ९० पोलीस अधिकारी आणि ३५२ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button