breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र
#CoronaVirus: गावी जावू देण्याच्या मागणीसाठी परप्रांतीय कामगारांचा रस्ता रोको
आम्हाला गावाकडे जावू द्या, यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करा’, अशी मागणी करत इचलकरंजी शहराबरोबरच परिसरातील ग्रामीण भागात असणार्या शेकडो परप्रांतीय कामगारांनी मंगळवारी पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलकांनी तासभर इचलकरंजी-सांगली मार्ग रोखून धरला होता.