breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रेस्टॉरंट, बार ५ ऑक्टोबरपासून सुरू, राज्यांतर्गतच्या रेल्वे धावणार

नवी दिल्ली – केंद्र सरकारने बुधवारी अनलॉक ५.० साठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्याअंतर्गत केंद्राने शाळा, कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय राज्यांवर सोडला आहे. येत्या १५ ऑक्टोबरनंतर शाळा आणि कोचिंग क्लासेस सुरू करायचे की नाही याविषयी राज्य सरकार स्वत: निर्णय घेऊ शकणार आहेत. पण यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या परवानगीची आवश्यकता असेल.

चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने चालवण्याची परवानगी, खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी स्विमिंग पूल उघडणार

  • अनलॉक – ५ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार १५ ऑक्टोबरनंतर शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात
  • सामाजिक, क्रीडा, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना यापूर्वीच जास्तीत जास्त १०० नागरिकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे
  • कंटेन्ट झोनमधील कठोर लॉकडाउन ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे
  • राज्य सरकारांनी कंटेन्मेंट झोनच्या बाहेर स्थानिक पातळीवर लॉकडाउन घोषित करू नये. आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी नाही
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button