breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यात कोरोनाचे ५००० रुग्ण बरे
राज्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याची विक्रमी नोंद झाली असून, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही दिलासा देण्याचं काम होत आहे. जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला एवढ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याची भेट राज्याला मिळाल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. काल सोमवारी ठाणे येथील २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील १६१ मुंबईतल ५५, रायगड येथील ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज त्यात बरे होणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.