breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: कोरोना संक्रमितांचा आकडा 5.11 लाखांवर; कोरोनाच्या उपचारासाठी सरकारकडून ‘डेक्सामेथासोन’ औषधाच्या वापराला मंजूरी

नवी दिल्ली: देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 5 लाख 11हजार 478 झाला आहे. हा आकडा covid19india.org नुसार आहे. दरम्यान,सरकारने कोरोनाच्या उपचारासाठी डेक्सामेथासोन औषधाला वापरण्याची मंजूरी दिलेली आहे. सूज कमी करण्यासाठी या औषधाचा वापर होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सीजन सपोर्टची गरज असेल, त्यांना हे औषध दिले जाणार आहे. डेक्सामेथासोनचा उपयोगमेथाइलप्रेडनिसलोनचा पर्याय म्हणून केला जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने डेक्सामेथासोनच्या प्रोडक्शनला वाढवण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटिश क्लीनिकल ट्रायलमध्ये हे औषध कोरोना संक्रमित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी असल्याचे समोर आले आहे.

तिकडे,दिल्लीत शनिवारी कोरोनाविरोधात सेरोलॉजिकल सर्वे सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत, 20 हजार सँपल घेतले जाणार आहेत. सेरोलॉजिकल एक अॅटीबॉडी टेस्ट आहे. व्हायरस किती पसरला आहे, हे यातून समजते आहे. या अंतर्गत त्या लोकांचे सँपल घेतले जातील, जे आधीपासूनच कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button