breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारताचा इशारा! ‘चीनने सीमेवर सैन्य वाढवण्याचा प्रयत्न केल्यास संबंध बिघडतील, चायनीज आर्मीने लड्डाखमधील कारवाया बंद कराव्या’

नवी दिल्ली: भारताने चीनला इशारा दिला आहे की, बॉर्डरवर सैन्य वाढवण्याचा प्रयत्न केल्यास फक्त शांती प्रक्रीयेवरच परिणाम पडणार नाही, तर दोन्ही देशांचे संबंध(बायलेटरल रिलेशनशिप)ही खराब होऊ शकते आहे.

पूर्व लद्दाखमधील कारवाया बंद कराव्यात असे चीनला सांगण्यात आलेले आहे. चीनमध्ये भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना शुक्रवारी केलेल्या बातचीतदरम्यान हे सांगितलेले आहे.

‘संबंध कसे ठेवायचे, हे चीनने ठरवावे’

मिसरी म्हणाले की, बॉर्डरवर चीनी सैनिकांमुळे दोन्ही देशांच्या संबंधावर वाईट वरिणाम पडलेला आहे. आता संपूर्ण जबाबदारी चीनची आहे की, त्यांना हे संबंध कसे ठेवायचे आहेत ? चीनने भारतीय सैनिकांच्या नॉर्मल पेट्रोलिंगमध्ये अडथळा आणू नये.

‘चीन त्या सेक्टरमध्येही सक्रिय, जिथे कधीच वाद झाला नव्हता’

मिसरी यांनी लद्दाखमध्ये गलवान व्हॅलीवर चीनच्या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले की, अशा खोट्या गोष्टींमुळे चीनला काहीच फायदा होणार नाहीये. बॉर्डरवर आमच्याकडून ज्या कोणत्या अॅक्टीव्हिटीज होतात, त्या लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (एलएसी)वर आमच्या सीमेत होतात. चीनला महत्वाच्या नसलेल्या अॅक्टिविटीज थांबवण्याची गरज नाही. हे चकित करणारे आहे की, ज्या सेक्टरमध्ये कधीच वाद झाला नाही, अशा ठिकाणीदेखील चीनने कारवाया केल्या होत्या.

सीमेवरील वादासाठी चीन जबाबदार’

भारतातील चीनचे राजदूत सुन वेडॉन्ग यांनी गुरुवारी म्हटले होते की, बॉर्डरवर तणाव कमी करण्याची जबाबदारी भारताची आहे. यावर मिसरी म्हणाले, आम्ही स्पष्ट करू इच्छितो की, आता सीमेवर जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याला सर्वस्वी चीन जबाबदार आहे. एप्रिल आणि मे मध्ये लद्दाखमध्ये एलएसीवर चीनच्या कारवाया वाढल्या होत्या, यामुळे आमच्या सैन्याला नॉर्मल पेट्रोलिंगमध्ये त्रास होत होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button