breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: कोरोना व्हायरसवरील लसी संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

वर्षअखेरीस अमेरिकेकडे करोना व्हायरसवर लस उपलब्ध होईल असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केला. ‘आम्हाला पूर्ण विश्वास आहे. वर्षअखेरीस आमच्याकडे करोना व्हायरसवर लस उपलब्ध असेल’ असे डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.Covid-19 वर प्रभावी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.

अमेरिकेसह जगातील प्रमुख देशांमध्ये Covid-19 ला रोखणारी पहिली लस बाजारात आणण्यासाठी एकप्रकारची स्पर्धा आहे. “करोना व्हायरसविरोधातील लस निर्मितीमध्ये अन्य देशांनी अमेरिकन संशोधकांवर मात केली तर आपल्याला आनंदच होईल” असे ट्रम्प म्हणाले.

‘मला बाकी काही माहित नाही, फक्त करोना व्हायरसला रोखणार लस हवी आहे’ असे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकेत सप्टेंबरमध्ये शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं सुरु करण्याचे त्यांनी आवाहन केले. सध्या करोना व्हायरसमुळे शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं बंद आहेत. लस निर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये मानवी चाचण्या नेहमीपेक्षा वेगाने सुरु आहेत, त्यामध्ये असलेल्या धोक्यांबाबत विचारले असता, ‘स्वयंसेवकांना आपण काय करतोय ते माहित असते’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button