breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘खासदारकीसाठी संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते’; शिंदे गटातील आमदाराचं वक्तव्य

आमच्या जुगाडा मुळेच संजय राऊत खासदार झाले

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज जळगावात जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, शिंदे गटातील आमदाराने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खासदारकीसाठी संजय राऊत स्वतः एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते, असं विधान आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत सध्या खानदेशात म्हणजे जळगावमध्ये आहेत. तिथे उन्हाचा पारा जास्त असल्याने आधीच वेडा असलेला माणूस आणखी वेडा झालेला आहे. त्यामुळे अशी बेछुट वक्तव्य ते करत असतात. मूर्खांचा जर कोण बादशाह असेल तर तो संजय राऊत आहे.

आम्हाला जे जमलं ते आम्ही करून दाखवलेला आहे आणि आमच्या जुगाडा मुळेच ते संजय राऊत हे खासदार झाले आहेत. संजय राऊतच स्वत: एकनाथ शिंदेंच्या पाया पडत होते माझी शेवटची टर्म आहे, त्यामुळे माला यंदा सांभाळून घ्या. नाहीतर संजय राऊत यांना कधीच पाडलं असतं. आमची मानसिकता होती ती शिंदे साहेब बोलले म्हणून आम्ही त्याला मत दिली, असंही संजय शिरसाट म्हणाले.

दुसरा संजय निवडून यायला पाहिजे होता हे आमचं प्रामाणिक मत होतं. परंतु मातोश्रीला प्रायोरिटी ही या संजयला घ्यायची होती. मतांची गोळा बेरीज पाहिली तर या संजय राऊतला जास्त मतांचा कोटा दिला. त्यामुळे हा संजय राऊत फक्त अर्ध्या मताने निवडून आलेला आहे. अर्ध्या डोक्याचा माणूस अर्ध्या मताने निवडून आलेला आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button