breaking-newsमनोरंजन

‘राजी’मुळे विकी ‘उरी’ चित्रपटाला देणार होता नकार, पण..

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ हा अभिनेता विकी कौशलच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला. बॉक्स ऑफीसवर हिट ठरलेल्या या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. या चित्रपटातून भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. जम्मू- काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केलानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. विकीच्या करिअरमध्ये एक महत्त्वाचं वळण घेऊन आलेल्या या चित्रपटाला मात्र तो सुरुवातीला नकार देणार होता. हे खुद्द विकीने एका मुलाखतीत सांगितलं.

याविषयी तो म्हणाला, ”खरंतर मी ‘उरी’ला नाही म्हणणार होतो. ‘राजी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला रोनी स्क्रूवाला टीमकडून एक फोन आला. तुम्हाला एका अॅक्शन फिल्मची स्क्रिप्ट पाठवत असून त्या चित्रपटासाठी तुम्हालाच पहिल्यांदा विचारलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या दिवशी मला स्क्रिप्ट मिळाली तेव्हा ‘राजी’मधला अत्यंत भावनिक सीन आम्ही शूट केला होता. त्या सीनचा माझ्यावर खूप प्रभाव झाला होता. घरी गेल्यावर मी ‘उरी’ची स्क्रिप्ट वाचली पण त्यावेळी मी एका अभिनेत्यासारखा विचार करत नव्हतो. सर्जिकल स्ट्राइक म्हणजे नेमकं काय झालं हे जाणून घेण्यासाठी मी ती स्क्रिप्ट वाचत होतो. कारण बातम्यांमध्ये त्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं. म्हणून एखाद्या पुस्तकाप्रमाणे मी ते वाचून काढलं. चार तास वाचूनही मी त्या कथेशी जोडला जात नव्हतो.”

पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत विकीने पुढे सांगितलं, ”स्क्रिप्टमध्ये बऱ्याच तांत्रिक गोष्टींचाही उल्लेख होता. भारतीय सैन्य आणि त्यांची विशिष्ट भाषा वगैरे. दिवसाचे १४ तास मी एका चित्रपटासाठी पाकिस्तानी मेजरची भूमिका साकारत होतो आणि दुसरीकडे अचानक मला भारत विरुद्ध पाकिस्तान असा विचार करावा लागत होता.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button