breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

#CoronaVirus | कोरोना विषाणूशी लढण्यासाठी गुगल खर्च करणार 49 काेटी

दिल्ली| गुगल भारतासह जगभरातील काेराेना व्हायरसशी निगडित खाेट्या माहितीचा सामना करण्यासाठी ६५ लाख डाॅलर (जवळपास ४९ काेटी रुपये) रक्कम खर्च करणार आहे. कंपनी या रकमेच्या माध्यमातून काेराेना व्हायरस महामारी संबंधित तथ्यांची पडताळणी करणारे (फॅक्ट चेकर्स) आणि स्वयंसेवी संस्थांची मदत करणार असल्याचे गुगलने शुक्रवारी आपल्या एका ब्लाॅगमध्ये म्हटले आहे. माहितीच्या अतिरेकामुळे लाेकांना या महामारीशी निगडित विश्वसनीय माहिती मिळणे अवघड हाेऊ शकते, असे आराेग्य अधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले आहे. चुकीच्या माहितीपासून लाेकांना वाचवण्यासाठी वैज्ञानिक, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व यांच्याकडून प्रतिक्रिया मिळणे गरजेेचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

जगभरातील या खाेट्या माहितीच्या विराेधात लढण्यासाठी कार्यरत असलेले फॅक्ट चेकर्स आणि ना नफा ना ताेटा संस्थांच्या मदतीसाठी आम्ही ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देत आहाेत, असे कंपनीने म्हटले आहे. आज लाेक आॅनलाइन सर्चिंगमध्ये जे विषय शाेधत आहेत ते विषय फॅक्ट चेकर्स आणि आराेग्य संघटनांनी निवडण्यासाठी त्यांना मदत करणे गरजेेचे आहे. जेथे चांगली आॅनलाइन माहिती उपलब्ध हाेण्यात फरक आहे तेथे अशा प्रकारची माहिती चिन्हांकित करण्याची आवश्यकता असल्याचे गुगलने म्हटले आहे. या कामासाठी आम्ही भारतात बूम लाइव्ह तर नायजेरियामध्ये आफ्रिका चेक यांच्याबराेबर भागीदारी करून डेटा लीड‌्सची मदत करत आहाेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button