breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

कोरोनाच्या युद्धात पराभूत व्हायचे नाही तर आपल्याला विजय मिळवायचा आहे – पीएम मोदी

नवी दिल्ली. भाजपचा आज 40 वर्धापन दिन आहे. याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या युद्धात आपल्या थकायचे किंवा पराभव स्वीकारायचा नाही. या दीर्घ युद्धात आपल्याला विजय मिळवायचा आहे. पीएम मोदींनी ट्विटरवर सर्व कार्यकर्त्यांना पक्षस्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच ते म्हणाले की, या कठीण प्रसंगी गरजुंना मदत करा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करण्याचे आवाहन केले. 6 एप्रिल 1980 रोजी भाजपची स्थापना झाली होती.

पंतप्रधानांनी सोमवारी सकाळी काही ट्वीट केले. त्यामध्ये ते म्हणाले की, “संपूर्ण देश कोविड-19 लढत असताना भाजपचा स्थापना दिवस आला आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे आणि सोशल डिस्टन्ससोबत गरजुंची मदत करावी. संघटित होऊन भारताला कोविड-19 पासून मुक्त करा.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button