breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

#CoronaVirus: ‘कोरोना’वर भारतात आणखी एका कंपनीने कमी किंमतीत लाँच केलं औषध

नवी दिल्ली: कोरोनावर रामबाण औषध निघालं नसलं तरी काही कंपन्यांनी या व्हायरसवर प्रभावी ठरणारी औषधं बाजारात आणलेली आहेत. Cipla आणि Hetero या कंपन्यानंतर आता ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylanने सोमवारी भारतात एक औषध लाँच केलं आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलणाऱ्या रुग्णांसाठी हे औषध प्रभावी ठरेल असा दावा कंपनीने केलेला आहे.

DESREMTM असं या औषधाचं नाव असून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने या औषधाला मान्यता दिली आहे. Mylanचं हे औषध जेनरिक मेडिसिन म्हणून बाजारात आणलं आहे. औषधाला मागणी मोठी असल्याने कंपनी त्याचा पुरवढा कमी पडू देणार नाही असं कंपनीने म्हटलेलं आहे.

बंगळुरू इथं असलेल्या आपल्या प्लांटमध्ये DESREMTM औषधाची निर्मिती होणार आहे. भारतातूनच आणखी काही देशांना या औषधाचा पुरवढा केला जाणार असल्याचंही कंपनीने म्हटलेलं आहे. औषधाच्या निर्यातीसाठी कंपनीने Gilead Sciences Inकडून t लायसन्सही प्राप्त केलं आहे. सिप्लाने आपल्या ‘Cipremi’ या औषधाची किंमत एका बॉटलसाछी 4,000 रुपये एवढी ठेवली आहे. तर Heteroने कोविफर’च्या (Covifor) औषधाची किंमत 5,400 रुपये आहे. तर Mylan ने या नव्या औषधाची किंमत 4,800 रुपये एवढी ठेवलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button