breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

व्हॅलेंटाईन वीकच्या पहिल्या दिवशी रोझ डे का साजरा केला जातो? काय आहे यामागचा इतिहास?

Rose Day | प्रेमात असलेल्या प्रत्येक कपल्स किंवा लव्हर्ससाठी फेब्रुवारी महिना खूप खास असतो. कारण ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत प्रेमाचा आठवडा भारतासोबत जगभरात साजरा केला जातो. असे सांगतले जाते कि व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस प्रेमाला प्रोत्साहन देण्यासाठी असतो. ज्यामध्ये कपल्स आपल्या जोडीदारांना गुलाब, टेडी आणि चॉकलेट देऊन एकमेकांशी त्यांच्या भावना व्यक्त करतात.

व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डेने होते. या लव्ह बर्ड्स त्यांच्या मनातील प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची मदत घेतात. पण तुम्हाला माहिती आहे का या दिवसाचा नक्की इतिहास काय? चला तर जाणून घेऊयात..

हेही वाचा    –    धमक होती तर काढा ना स्वत:चा पक्ष, कुणी अडवलं होतं? अजितदादांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल 

रोझ डेचा इतिहास

रोझ डेच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर असे म्हटले जाते की मुघल बेगम नूरजहाँ यांना लाल गुलाब खूप आवडत होते. नूरजहाँला खूश करण्यासाठी जहांगीर रोज एक टन ताजे लाल गुलाब तिच्या राजवाड्यात पाठवत असे. त्यांची ही प्रेमकहाणी लोकांमध्ये चांगलीच प्रसिद्ध झाली. तसेच प्रत्येक गुलाबाचा वेगवेगळा अर्थ असल्याचे देखील सांगतले जाते.

गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय?

  • लाल गुलाब – तुम्हाला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असलेल्या व्यक्तीला ते द्या.
  • गुलाबी गुलाब – तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला देऊन मैत्री आणखी घट्ट करू शकता.
  • पिवळा गुलाब – जर तुम्हाला कोणाशी मैत्री करायची असेल तर त्याला पिवळे गुलाब द्या.
  • केशरी रंगाचे गुलाब – जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर त्याला केशरी रंगाचे गुलाब देऊन त्याच्यासमोर भावना व्यक्त करा.
  • पांढरा गुलाब – एखाद्याशी वैर संपवून माफी मागायची आहे तर त्याला पांढरा गुलाब द्या. ते शांततेचं प्रतीक आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button