breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, भारतात गेल्या २४ तासात ७३ जणांचा मृत्यू; १८९७ नवे रुग्ण
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्याता आलेला लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्यापही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही. भारतात गेल्या २४ तासात ७३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. सोबतच १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात सध्या करोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली आहे. तर मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे.